CM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा करून स्थानिक पातळीवर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करत असल्यामुळे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी कोणती मदत जाहीर करतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूर परिस्थितीची पाहणी करून (inspect the flood situation in Kolhapur) पूरग्रस्तांची संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे chief minister Uddhav Thackeray शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तर, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis रात्री कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

    असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टरीय विमानतळ, सांताक्रूझकडे रवाना होतील. विमान तळावरुन कोल्हापूरला जातील. कोल्हापूर विमानतळावरुन मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोडकडे रवाना होतील. शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. त्यानंतर शाहूपूरी ६वी गल्ली, कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील. त्यानंतर पंचगंगा हॉस्पीटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. कोल्हापूरमधील पूरबाधित भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 ते 1.30 पर्यंत करतील.

    दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा करून स्थानिक पातळीवर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करत असल्यामुळे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी कोणती मदत जाहीर करतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.