कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा चिंतेत भर; कोरोनाबरोबरच ‘या’ आजाराचा वाढला धोका

कोल्हापूर मध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. म्युकरमायकोसिस आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून कहर माजवला असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

    कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असताना महाराष्ट्रातील विविध भागांमधून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’, असल्याचं गंभीर चित्र दिसून येत आहे.

    दरम्यान त्यातच आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. म्युकरमायकोसिस आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून कहर माजवला असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

    कोल्हापूरमध्ये म्युकरमायकोसिसचे काल 08 नवे रुग्ण आढळून आले. कोल्हापूरमध्ये सध्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसताना या आजाराचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच आत्तापर्यंत 22 जणांचा म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे.

    म्युकरमायकोसिसचा संसर्ग वाढला असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देताना मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हतबलता दिसून येत आहे. तसेच रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.