चिंता वाढली : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्हिटी दर तर तब्बल १५.९५ असून हा दर राज्यात सर्वाधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभर रोज दीड हजारापर्यंत करोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता कायम आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या प्रमुख शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या मोठी असल्याने व पॉझिटिव्हिटी दरही जास्त असल्याने चिंता कायम आहे. राज्यात आज मृत्यूंचा आकडाही वाढून ४०६ वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेपुढे याबाबतचे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत असताना शेजारच्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्हिटी दर तर तब्बल १५.९५ असून हा दर राज्यात सर्वाधिक आहे.

  दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभर रोज दीड हजारापर्यंत करोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता कायम आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या प्रमुख शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या मोठी असल्याने व पॉझिटिव्हिटी दरही जास्त असल्याने चिंता कायम आहे. राज्यात आज मृत्यूंचा आकडाही वाढून ४०६ वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेपुढे याबाबतचे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  तर दुसरीकडे राज्यातील करोना रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून ९५ टक्क्यांवर जाऊन काहीसा स्थिरावला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी आठवडाभराचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर जाहीर केला. त्यामध्ये कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर १५.९५ टक्के तर सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.३३ टक्के आहे. या तुलनेत सांगलीचा दर कमी झाला असून तो ६.७७ आहे. या तीनही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत बारा हजार जणांचा करोनाने बळी घेतला आहे. चार लाखांवर लोकांना करोनाने आपल्या विळख्यात घेतले होते पण त्यातून सुटका करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

  कोल्हापूर करोना स्थिती

  शुक्रवारचे रुग्ण- १८५५
  शुक्रवारी झालेले मृत्यू- २९
  उपचार घेत असलेले रुग्ण- १२५००