कोरोना ड्युटी परवडली पण आरोग्य उपसंचालक बोरसेंचा त्रास नको – आरोग्याचे डॉक्टर अधिकारी,कर्मचारी वैतागले..

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी मूळे संपूर्ण देशांबरोबर महाराष्ट्र होरपळून निघत आहे.आरोग्य विभागाबरोबरच सर्व स्तरातील यंत्रणा कामाला लागली आहे.मात्र वातानुकूलित कार्यालयात खुर्ची गरम करत बसणाऱ्या डॉ.हेमंतकुमार बोरसे यांनी एकदाही चार जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि अन्य आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना काय हवे काय नको याबाबत उपाय योजना केलेल्या नाहीत अशी ओरड आरोग्य विभागात दररोज सुरू असल्याची माहिती आहे.

   

  कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक डॉ.हेमंतकुमार बोरसेंचा मनमानी कारभार पराकोटीला गेला आहे.त्यामूळे कोरोना ड्युटी परवडली पण आरोग्य उपसंचालक डॉ.हेमंतकुमार बोरसे यांचा त्रास नको अशी मानसिकता कोल्हापूर जिल्ह्यासह चार जिल्ह्यातील डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची झाली आहे.त्याच बरोबर डॉ.बोरसेंच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या पर्यंत पोहचल्याने आता त्यांची चांगलीच चौकशी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  लातूर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ.हेमंत कुमार बोरसे यांच्याकडे दोन वर्षांपासून आरोग्य उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्या पासून डॉ.बोरसे हे सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत आहेत.डॉक्टर बोरसे यांच्याकडून मंत्री,खासदार,आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सुरू आहे.त्यामूळे जिल्ह्यातील विशेष करून काही डॉक्टरांना हेरून त्यांच्या बदल्या करण्याचे जाणीवपूर्वक आदेश काढून डॉ.बोरसे आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयातील त्यांचे काही फंटर कारकून पैसे उकळण्यासाठी नेहमीच जाळे फेकत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत अशी चर्चा आता आरोग्य विभागात दबक्या आवाजात सुरू आहे.

  अशातच शासनाकडून आलेला तब्बल तीन कोटी रुपयांचा औषधे ठेवण्याचा कुलर आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या आवारात उघड्यावर भर पावसात ठेवून त्याचे नुकसान करण्यासाठी डॉ.बोरसे हे जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा केला जात असल्याने गेल्या आठवड्यात आपल्याला कोरोना झाल्याचा कांगावा करून डॉ.बोरसे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्या मूळ लातूर जिल्ह्यात धूम ठोकल्याचे कळते.मात्र काही प्रसारमाध्यमांनी या कार्यालयाचे चांगलेच वाभाडे काढल्याने आता डॉ.बोरसे करत असलेला मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी डॉ.बोरसे यांना चौकशीसाठी बोलावल्याची अधिकृत माहिती आहे.तर भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या दीड वर्षांपासून डॉ.बोरसेंच्या मनमानी कारभाराची तक्रार करून त्यांची कोल्हापूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक पदावरून उचल बांगडी करावी म्हणून पाठपुरावा केला आहे.मात्र डाव अंगलट आला की आपल्या रंग बदलण्याच्या कले मूळे डॉ.बोरसे यांनी आपले बस्तान कोल्हापुरात अतिशय सुनियोजित पणे बसवल्याची चर्चा आरोग्य विभागात सातत्याने सुरू असल्याची माहिती आहे.

  दीड वर्षांपासून डॉ.बोरसे यांनी एक ही बैठक घेतली नाही

  गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी मूळे संपूर्ण देशांबरोबर महाराष्ट्र होरपळून निघत आहे.आरोग्य विभागाबरोबरच सर्व स्तरातील यंत्रणा कामाला लागली आहे.मात्र वातानुकूलित कार्यालयात खुर्ची गरम करत बसणाऱ्या डॉ.हेमंतकुमार बोरसे यांनी एकदाही चार जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि अन्य आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना काय हवे काय नको याबाबत उपाय योजना केलेल्या नाहीत अशी ओरड आरोग्य विभागात दररोज सुरू असल्याची माहिती आहे.

  एका मंत्र्याकडे प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या सचिवाबरोबर लागे बांधे ?

  तर याच विभागात चार जिल्ह्यातील डॉक्टरांच्या अस्थापनेचे टेबल सांभाळणाऱ्या परंतु आता प्रतिनियुक्तीवर एका मंत्र्याकडे सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याबरोबर सुद्धा डॉ.बोरसे यांचे चांगलेच लागेबांधे असल्याची चर्चा आहे.याबाबत सुद्धा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.