daulat desai

जानेवारीपासून(vaccination from January) कोल्हापूर जिल्ह्यात राज्य शासनामार्फत कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण(corona vaccination in kolhapur) करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे.

कोल्हापूर: राज्य शासनामार्फत जानेवारीपासून(vaccination from January) कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण(corona vaccination in kolhapur) करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

कोव्हिड-१९ लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात आज झाली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई आदी उपस्थित होते.

नोडल अधिकारी डॉ. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ५ लाख ५७ हजार १७६ लाभार्थी पहिल्या टप्प्यासाठी आहेत. जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत.

डॉ. साळे म्हणाले, लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखन्यातील आरोग्य सेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृतीदल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत. अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लस जिल्ह्यात देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्याशी निगडीत जे कर्मचारी आहेत खासगी, शासकीय आणि निमशासकीय या सर्वांचा त्यात समावेश आहे. सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांची नोंदणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. मात्र खासगी डॉक्टर्स आणि खासगी आरोग्य यंत्रणेशी निगडीत काम करणारे जे सेवक आहेत, संस्था आहेत यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहे.

जे वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्यांनी वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केली आहे अशा सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या दवाखन्यात काम करणारे सर्व आरोग्‍य सेवक आणि पॅरामेडीकल स्टाफ यांनी आपली नोंदणी तालुका आरोग्य अधिकारी, शहर वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयात नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून पुढील महिन्यात सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेत सुलभतेने लसीकरण करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. बैठकीला राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, नगरपालिका प्रशासन एम. एस. निगवेकर, एस.एस. घोरपडे आदी उपस्थित होते.