Corona's second wave hits western Maharashtra; Even today all the three districts are in the red zone nrms | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पश्चिम महाराष्ट्राला जबरदस्त तडाखा ; आजही ‘हे’ तीनही जिल्हे रेड झोनमध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
कोल्हापूर
Published: Jun 05, 2021 08:00 AM

कोरोनाची दुसरी लाट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पश्चिम महाराष्ट्राला जबरदस्त तडाखा ; आजही ‘हे’ तीनही जिल्हे रेड झोनमध्ये

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पश्चिम महाराष्ट्राला जबरदस्त तडाखा ; आजही ‘हे’ तीनही जिल्हे रेड झोनमध्ये

मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

  या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.

  मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

  परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १६ बुधवार
  बुधवार, जून १६, २०२१

  कपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.