bhanu athayya

कोल्हापूर: गांधी सिनेमातील वेशभुषेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणार्‍या वेशभूषाकार भानू अथय्या यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी गुरुवारी सायंकाळी निधन झाले. भानू अथय्या या मूळच्या कोल्हापूरच्या असून ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय वेशभूषाकार होत्या.

कोल्हापूर: गांधी सिनेमातील वेशभूषेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणार्‍या वेशभूषाकार भानू अथय्या यांचे वयाच्या ९१व्या वर्षी आज सायंकाळी मुंबईत ब्रेन कॅन्सरने निधन झाले.(costume designer bhanu athayya death) भानू अथय्या या मूळच्या कोल्हापूरच्या असून ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय वेशभूषाकार होत्या.

भानू यांची रेखाटने पाहून १९६० च्या दशकात अभिनेत्री नर्गिस प्रभावित झाल्या . नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या श्री ४२० या सिनेमाच्या वेशभूषेचे काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गुरुदत्त यांचा साहिब बीबी और गुलाम, देव आनंद यांचा गाईड , आम्रपाली, शम्मी कपूर यांचा ब्रह्मचारी , ओम शांती ओम या हिंदी सिनेमातील वेशभूषेचे काम करता करता त्याना गांधी या सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील गांधीजींच्या वेशभूषेसाठी भानु अथैया यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले जोम मोलो यांच्यासोबत विभागून हे पारितोषिक असले तरी हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

तसेच लगान, स्वदेस यासारख्या सिनेमातील कलाकाराच्या वेशभूषा त्यांनी समर्थपणे साकारलेल्या आहेत. अमोल पालेकर यांच्या महर्षी कर्वे या मराठी सिनेमासाठी त्यांनी वेशभूषा केली होती. दक्षिणात्य वेशभूषाकार सत्येंद्र यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून काही वर्षांपूर्वी सत्येंद्र यांचे निधन झाले असून त्यांना एक मुलगी आहे.

भानु अथैया यांचे मुळ नाव भानुमती. यांचा जन्म कोल्हापूरमधील. गुजरी परिसरातील राजोपाध्ये रोड वर त्यांचे आजही जुने घर आहे. यांच्या आईचे नाव शांताबाई तर वडिलांचे नाव आण्णासाहेब होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी चित्रकलेशी दोस्ती केली तर त्याच दरम्यान त्यांनी एकादशी महात्म्य या सिनेमात बालकलाकार म्हणून देखील काम केले होते. नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेची आवड पाहून त्यांच्या आईने त्यांना चित्रकलेचे शिक्षण दिले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मुंबईचा जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कॉलेजमध्ये चित्रकलेच्या शेवटच्या वर्षी त्याने सुवर्णपदक देखील मिळाले होते.

करवीरच्या कन्या असलेल्या आणि जागतिक पातळीवर गांधी चित्रपटातून वेशभूषेचे ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या भानू अथैय्या यांचे कला क्षेत्रातील योगदान नेहमी सर्वांना प्रेरणा देत राहील. कोल्हापुरातून मुंबई महानगरातील कला, चित्रपट क्षेत्रात आपल्या सर्जनशील कलेने दिलेले त्यांचे योगदान नक्की सर्वांना व समस्त महिलावर्गाला आदर्शवत असेच ठरलेले आहे, कोल्हापूरकरांतर्फे त्यांना श्रध्दाजंली. – महापौर निलोफर आजरेकर