धक्कादायक! टेनिस बॉल कापून त्यात भरला गांजा आणि.., जाणून घ्या काय आहे प्रकार?

तीन संशियत तरुण टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरत असत. कापलेले टेनिस बॉल पुन्हा चिटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा प्लॅन उधळून लावला. तसेच गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

 कोल्हापूर : कोल्हापूरमधील(Kolhapur)  कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail)  टेनिस बॉलमधून (tennis ball) गांजा पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहचवण्याचा इऱादा असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तीन संशियत तरुण टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरत असत. कापलेले टेनिस बॉल पुन्हा चिटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा प्लॅन उधळून लावला. तसेच गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या कारवाईत कापून पुन्हा चिकटवलेले टेनिस बॉल आणि १५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी वैभव कोठारी,संदेश देशमुख आणि अमित पायगुडे असा तीन संशतियांना अटक केली आहे. तिघेही संशतिय पुण्याचे असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.