कुंभोज परीसरात एसटी बस फेरी वाढवण्याची मागणी

इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकातून या गावांकडे जाण्यासाठी मिनी बस उपलब्ध असायच्या मात्र त्याही आता बंद आहेत. महामंडळाकडून एका दुसरी फेरी चालू आहे मात्र कुंभोज दुर्गेवाडी निज बाहुबली हिंगणगाव आदी गावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे

    हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज नेज शिवपुरी दुर्गेवाडी हिंगणगाव या गावांना हातकणंगले या मुख्य ठिकाणापासून जवळपास आठ ते दहा किलोमीटर इतके अंतर आहे सध्या कोरूना प्रादुर्भावामुळे या गावांकडे जाणारे एसटी महामंडळाच्या गाड्या तसेच खाजगी वडाप बंद आहेत यासाठी एसटी बसच्या फेरी वाढवावी अशी मागणी प्रवाशांच्यातून होत आहे.

    इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकातून या गावांकडे जाण्यासाठी मिनी बस उपलब्ध असायच्या मात्र त्याही आता बंद आहेत. महामंडळाकडून एका दुसरी फेरी चालू आहे मात्र कुंभोज दुर्गेवाडी निज बाहुबली हिंगणगाव आदी गावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र सध्या एसटी व परवान्याच्या अभावी खाजगी वाहतूक करणारे वडात बंद असल्यामुळे विद्यार्थी प्रवासी व कामगार वर्गांचे विशेषता महिलांचे हाल होत आहेत परवाना अभावी गेली कित्येक वर्ष चालू असलेली वडाप वाहतूक स्थानिक पोलिस प्रशासनाकडून बंद केल्याने याचाही मोठा फटका खाजगी वाहन चालकांना बसला आहे.

    त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या कोरोना प्रादुर्भाव आच्या प्रतिबंधात्मक नियमांमध्ये सूट मिळाल्याने महाविद्यालय खाजगी क्लासेस तसेच अनेक उद्योगधंदे सुरू झाल्यामुळे या गावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे मात्र वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत ठराविक वेळेनंतर वाहने उपलब्ध नसल्याने महिलांना तर कित्येक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

    या गावातील प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का खाजगी वाहतूक राहू दे पण एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या ेफेऱ्या वाढवण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे गेल्या अनेक वर्षांपासून कुंभोज ते हातकणंगले हातकणंगले ते कुंभोज तसेच आसपासच्या गावांमधील प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांना स्थानिक पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत गेले कित्येक वर्षांपासून खासगी त्या खाजगी वाहन चालकांचे संसार प्रवासी वाहतुकीवर अवलंबून आहेत मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या संकटाला सामोरे जाता जाता नाकीनऊ आलेल्या खाजगी वाहन चालकांना स्थानिक प्रशासनाने निर्बंध घातल्याने जगणे मुश्किल झाले आहे त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रवासी व खाजगी वाहतूक करणारे चालक व्यवसायिक यांच्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.