राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

३१ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांपासून राज्यात सर्वांच्या लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar In Kolhapur) यांनी कोल्हापुरात दिली.

  कोल्हापूर : केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लस लोकांना देण्यात येत आहे. सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी लसीकरण(Vaccination) उत्पादनात वाढ केली आहे. लस अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. यातून ३१ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांपासून राज्यात सर्वांच्या लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar In Kolhapur) यांनी कोल्हापुरात दिली.

  म्युकर मायकोसिस रुग्णांना शासकीय रुग्णालयात तसेच महात्मा फुले योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहे. खाजगी रुग्णालयातही बिल आकारणीबाबत केपिंग केले असून त्यानुसार त्यांनी बिल आकारले पाहिजे अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.

  कोल्हापूरला दिलासा नाहीच

  कोल्हापूर जिल्ह्यात व्यवसाय, व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास सवलत दिली जाणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी सद्यस्थितीत निर्बंध अजिबात मागे घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

  कोरोना नियमावलीचे पालन करणार नाही त्यांच्यावर अधिक कडकपणे कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलिसांना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर यादी दिली आहे. मुंबईत गेल्यानंतर हे प्रश्न मार्गी लावण्यात येईल. शासकीय कर्मचारी भरतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

  मराठा आरक्षण

  मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न आहे. याबाबत न्यायालयीन गुंता निर्माण झालेला आहे. आरक्षणाबाबत केंद्र शासनाने पावले टाकण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे, असेही पवार म्हणाले.