कोल्हापूरमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूरपासून सुमारे १८ किमीच्या अंतरावर असलेल्या कळे ते पूनाळ या दरमानच्या भागात भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये काल (शनिवार) भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. कोल्हापूरपासून सुमारे १८ किमीच्या अंतरावर असलेल्या कळे ते पूनाळ या दरमानच्या भागात भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    कळे गावाजवळ केंद्रबिंदू असलेल्या जमिनीखाली तब्बल ३८ किलो मीटरवर होेता. भूकंपाची तीव्रता आणि धक्का सौम्य असल्यामुळे सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु भुमापन केंद्र वारणा तसेच कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याचे समजले जात आहे.