२०२४ मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा ; चंद्रकांत पाटील यांचा दावा

'एकाने मारायचं दुसऱ्याने समजवायचं' असा खेळ राज्य सरकारमध्ये सुरू आहे, हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही, त्याची शिक्षा त्यांना निवडणुकीत मिळेल, सरकारचं नाटक चालू आहे त्याला लोकं विटली आहेत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

    कोल्हापूर :  देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. २०२४ मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

    ‘एकाने मारायचं दुसऱ्याने समजवायचं’ असा खेळ राज्य सरकारमध्ये सुरू आहे, हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही, त्याची शिक्षा त्यांना निवडणुकीत मिळेल, सरकारचं नाटक चालू आहे त्याला लोकं विटली आहेत, असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

    राजनितीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.