राज्यातल्या परप्रांतीय कामगारांनो महाराष्ट्र सोडू नका; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

    कोल्हापूर : राीज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडऊनचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यातील परप्रांतीय कामगार गावाला जाण्यासाठी गर्दी करत आहेत. यावरुन मंत्री हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीयांना आवाहन केलं आहे.

    मश्रीफ म्हणाले की, राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे हसन मुश्रीफ यांनी आवाहन केलं आहे.

    दरम्यान एकीकडे लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतत असले तरी नागपुरातील काही कामगारांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.