वाघाचे काळीज खाणाऱ्या माजी पोलीस पाटलास अटक

  कोल्हापूर : मौजे शिवडाव, ता. भुदरगड येथील माजी पोलीस पाटील वसंत महादेव वासकर (वय 55) याच्या राहत्या घरावर छापा मारून बिबट्याची नखे, काळीज, बंदूक असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदरची ही कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

  याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिवडाव, ता. भुदरगड येथील माजी पोलीस पाटील वसंत महादेव वासकर यांनी वन्य प्राण्यांची शिकार केली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास घरावर छापा मारण्यात आला.

  सदर छाप्यात त्याच्या घरात 3 वाघांच्या नख्या, तसेच फ्रिजमध्ये ठेवलेले वन्य प्राण्यांचे काळीज आढळून आले. याशिवाय शिकारीसाठी वापरलेली बंदूक ही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी वसंत महादेव वासकर यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने तीन नख्या घरातील स्वयंपाक घरात हळदीच्या डब्यात (3) तीन नख्या लपवून ठेवले होते. तर (2) दोन नख्या त्याने एकास विकले आहे.

  वन्यप्राण्यांचे काळीज त्याने फ्रिजमध्ये लपवून ठेवले होते. सदर आरोपी याने यापूर्वी असे अनेक कारनामे केले आहेत. आरोपीने ही शिकार जंगलात स्वतः कडे असलेल्या एक जीप व बंदूक घेऊन केले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
  कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाहीमध्ये सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल फिरते पथक युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक सांगली अजितकुमार पाटील व वनविभागाचे इतर वनपाल, वनरक्षक,
  सहभागी झाले होते. अधिक तपास सहहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे करीत आहेत.