नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे रूप: राजू शेट्टी यांची जलसमाधी परिक्रमा

जलसमाधीसाठी येणाऱ्या शेट्टीना व कार्यकतर्याना रोखण्यासाठी नृसिंहवाडी येथे पाचशे ते सहाशे पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात आहेत. पूर्ण वाडी परिसराला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले आहे.

    जयसिंगपूर: पूरग्रस्त व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी १ सप्टेंबर पासून सुरू असलेली प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी परिक्रमेची आज नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे . त्यानंतर माजी खा.राजू शेट्टी असंख्य कार्यकर्तेच्या समवेत जलसमाधी घेणार असल्याने संपूर्ण परिसराला सकाळपासूनच पोलीस छावणीचे , स्वरूप आले आहे.
    शासनाने पूरग्रस्तांना योग्य न्याय दिला नसल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप आहे. पूरग्रस्तांना न्याय द्या अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता.परंतु सरकारने त्यावर कोणतीही हालचाल केली नसल्याने गेले पाच दिवस ही परिक्रमा सुरू आहे. शनिवारी हजारो पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत ही पदयात्रा अब्दुललाट (ता.शिरोळ) येते मुक्कामास होती. रविवारी सकाळी हेरवाड पासून पदयात्रा नृसिंहवाडीकडे विविध ठिकाणीहून मार्गक्रमण करत आली
    दरम्यान, जलसमाधीसाठी येणाऱ्या शेट्टीना व कार्यकतर्याना रोखण्यासाठी नृसिंहवाडी येथे पाचशे ते सहाशे पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात आहेत. पूर्ण वाडी परिसराला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त व शेतकरी सहभागी झाले आहेत. नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्यात येणार असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या तीन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ यावर लक्ष ठेऊन आहेत