शिवसेना तमदलगे शाखाप्रमुखपदी गजानन खराडे यांची निवड

शिवसेना तमदलगे (ता.शिरोळ) शाखाप्रमुखपदी गजानन खराडे यांची निवड झाली. युवासेना तमदलगे प्रमुखपदी संकेत खराडे यांची निवड झाली.

    जयसिंगपूर :  शिवसेना तमदलगे (ता.शिरोळ) शाखाप्रमुखपदी गजानन खराडे (Gajanan Kharade) यांची निवड झाली. युवासेना तमदलगे प्रमुखपदी संकेत खराडे यांची निवड झाली. तर युवासेना पंचायत समिती दानोळी विभाग प्रमुखपदी मंदार गुरव यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र पदाधिकाऱ्यांनी दिले.

    यावेळी संपर्कप्रमुख राजाराम सुतार, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, युवा सेना तालुका अधिकारी प्रतीक धनवडे, माजी तालुकाप्रमुख सतीश मलमे, युवा नेते राकेश खोंद्रे, संजय अनुसे,धनाजी नंदिवाले यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

    याप्रसंगी युवानेते राकेश खोंद्रे म्हणाले, शिवसेना हा पक्ष केवळ उत्तम संघटनेमुळे टिकला आहे. यापुढे ही तरुणांना संघटित करून घराघरात शिवसेना पक्ष पोहोचावा यासाठी नेहमी प्रयत्न करणार आहे.