Annual General Meeting of Gokul Dudh Sangh in Kolhapur

३६ ऐवजी ७० ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या कोर्टाच्या सूचना आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल. आता सत्ताधारी गटाने जागतिक कोर्टात जाऊ नये. कोर्टाच्या सूचनांचे पालन करून निवडणूक होईल. पॉझिटिव्ह आलेल्या ठरावधारकांना शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करु दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

    कोल्हापूर : गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सत्ताधारी गटाने केलेली याचिका कोर्टात फेटाळण्यात आल्यानंतर आहा ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोकुळ दूधसंघातील सत्तारुढ गटाने निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

    यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला २६ एप्रिलपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळ दूधसंघाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट केले. कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला.