गोकुळची दूध दरवाढ विक्री थांबली

    कोल्हापूर : गोकुळच्‍या दूध विक्री दरात दोन रूपये वाढ करण्याबाबतचा निर्णय झाला नसल्याने अन्य संघाशी चर्चा करून दर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताराबाई पार्क येथील कार्यालयात संघाच्‍या संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी अमुल दूध संघाने राज्यात दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजीत करण्‍यात आली होती.

    अंतिम निर्णयाचे अधिकार अध्यक्षांना

    गोकुळची दूध विक्री ही इतर सहकारी दूध संघाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अमुलने दूध विक्री वाढीच्‍या घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वारणा, चितळे, राजाराम बापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दरवाढी बाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्‍याचे सर्वांचे एकमत झाले.
    इतर संघाशी चर्चा करण्याचा संपूर्ण अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, चेतन नरके, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी.. व्‍ही. घाणेकर व अधिकरी उपस्थित होते.