उत्पादाकांना दिलासा, नागरिकांना भुर्दंड ; जाणून घ्या गाई आणि म्हशीच्या दुधाचे दर

गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला  ३९ रुपये तर गाईच्या दुधासाठी २६ रुपये दर देत आहे. जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना २ म्हशीच्यापर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे.

    कोल्हापूर: उद्या (दि. ११ ) जुलैपासून गोकुळ दूध संघाने दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली. तसेच शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध खरेदी दरात २ रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात १ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. या दूध खरेदीवर दर वाढीमुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भागात दूध विक्री दरातही २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

    गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला  ३९ रुपये तर गाईच्या दुधासाठी २६ रुपये दर देत आहे. जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना २ म्हशीपर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो टप्पा लवकरच गाठणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथं जिथं गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तिथल्या ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत.

    जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना २ म्हशीपर्यंत विनातारण कर्ज देणार. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो टप्पा लवकरच गाठणार- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ