‘गोकुळ’च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

    कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्‍या १४७ व्‍या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पूजन करण्‍यात आले.
    राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक सुधारणांबरोबरच शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला, महाराजांनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणारा उपक्रम ठरला. शेतीविषयक धोरणे राबवून त्यांनी कोल्हापुर सुजलाम्‌-सुफलाम्‌ केल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.