hasan mushrif in a meeting

मे २०२२ अखेर कोल्हापूर वासियांना काळम्मवाडी धरणातून(Kalammwadi Dam) पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी दिली.

    कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur)शहरातील जनतेला शुद्ध ,मुबलक आणि थेट पाणी पुरवठा(Water Supply) व्हावा,या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून(Kalammwadi Dam) पाणी पुरवठा(Water Supply From Dam) करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती.काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र मे २०२२ अखेर कोल्हापूर वासियांना काळम्मवाडी धरणातून(Kalammwadi Dam) पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी धरणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

    व्यासपीठावर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे,माजी महापौर निलोफर आजरेकर,अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आर.के.पवार उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले, शहराला थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल.सुमारे ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतुद करण्यात आली असून या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला निर्देश देवून हसन मुश्रीफ यांनी २०२२ साली येणारी दिपावली तमाम कोल्हापूरवासियांच्या जीवनात आनंद निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला.त्याचबरोबर २०२१ च्या दिपावली सणामध्ये आपण कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करु शकलो नसल्याबद्दल शहरवासियांची क्षमा मागितली.लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

    या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे केवळ तीन किलो मीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पुर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली.तर हर्षजीत घाटगे यांनी या योजनेचे सादरीकरण केले.यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.