hasan mushrif

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवल्यानंतर, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेत रोखल्याने कराडहून माघारी यावं लागलं होतं.

    कोल्हापूर : दहा वर्षामागील प्रकरणे उकरून काढून त्यातून काहीही साध्य होणार नाही; असा स्पष्ट निर्वाळा देत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापुरात येऊन दया. तसेच त्यांना विरोध करणारा हा माझा कार्यकर्ता नसेल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकार बैठकीत केले.

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात गदारोळ उठला आहे. त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू द्यायचं नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतले आहे. तर मुरगूड येथे आले असता त्यांना कागल ओलांडून द्यायचे नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तसे मुश्रीफ गटाच्या समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच कोल्हापुरात येऊन मौन सोडले .

    यावेळी त्यांनी सांगितले, यापूर्वी सुद्धा माझ्यावर आरोप झालेले होते परंतु त्यातून काही सुद्धा सिद्ध झाले नाही त्यामुळे जी काही चौकशी करायचे आहे ती त्यांना करू द्या कोणीही त्यांना विरोध करू नका महाविकास आघाडी सरकार कोसळत नसल्याने सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. सोमय्या कोल्हापुरात येत असताना त्यांना कोणीही विरोध करू नये तसेच आपल्या शेतात काम करत राहावे; त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. कोल्हापूरात येत असताना जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगणार आहे. त्यांना येऊ दयावे जो कोणी त्यांना विरोध करेल तो माझा कार्यकर्त्यां असणार आहे असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

    भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवल्यानंतर, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेत रोखल्याने कराडहून माघारी यावं लागलं होतं.

    कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी केली होती. शिवाय, किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापुरला जाण्यासाठी निघाल्यानंतर, कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते आक्रमक झाले होते आणि जर सोमय्या कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.
    आता परत एकदा सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची घोषणा केलेली आहे, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

    मुश्रीफांचा खुलासा

    सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना ही ११ वर्षांपूर्वीची घटना आहे. तर गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना हा ब्रिक्स कंपनीने चालवण्यास देण्याची घटना १० वर्षांपूर्वीची आहे. मात्र घोरपडे कारखान्याची यापूर्वी केंद्रीय विभागाकडून चौकशी झाली आहे. त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. तर गडहिंग्लज साखर कारखाना चालवताना ब्रिस्क कंपनीला १० वर्षात ८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

    साखर कारखानदारी चालवणे हे आव्हानास्पद आहे. याची माहिती सोमय्या यांनी नितीन गडकरी यांच्यासह भाजपात प्रवेश केलेल्या साखर कारखानदारांकडून घ्यावी. काहीही आरोप करू नयेत. सोमय्या यांनी अनाठायी विधान केल्यामुळे कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावनेतून प्रत्युत्तर दिले होते. या कार्यकर्त्यांनी सोमय्या हे कोल्हापूर येतील तेव्हा संयमाने वागावे. किंबहुना त्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करावे असेही म्हणाले.