hail storm in kolhapur

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा मुसळधार पाऊस(heavy rain with hailstorm in kolhapur) पडला. शहरात एक तास पडणाऱ्या पावसात मोठमोठ्या गारा पडत असल्याने रस्ते पांढऱ्या शुभ्र चादरी अंथरल्यासारखे दिसत होते.

    कोल्हापूर: गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वातावरण अचानक बदलल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा मुसळधार पाऊस(heavy rain with hailstorm in kolhapur) पडला. शहरात एक तास पडणाऱ्या पावसात मोठमोठ्या गारा पडत असल्याने रस्ते पांढऱ्या शुभ्र चादरी अंथरल्यासारखे दिसत होते. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते.

    hail

    या मुसळधार पावसामुळे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

    गेल्या काही दिवसांपासून रखरखत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. प्रचंड उकाडा जाणवत होता.पारा सुद्धा ४० /४५ अंश सेल्सिअसच्या वर जात होता. मात्र गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळासाठी का होईना हवेत गारवा निर्माण झाला. लॉकडाऊनमुळे शहरात रस्त्यांवर वर्दळ नसली तरी लोकांनी आपल्या घरात बसून आज पावसाची मजा लुटली.