कोल्हापुरातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढू लागल्यामुळे श्रीक्षेत्र नरसी वाडी मंदिरमध्ये आता सुमारे 10 ते 12 फूट पाणी आले आहे.

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढू लागल्यामुळे श्रीक्षेत्र नरसी वाडी मंदिरमध्ये आता सुमारे 10 ते 12 फूट पाणी आले आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल होत आहे.

    दरम्यान पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट तर धोका पातळी 43 फुट आहे. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.