मी राष्ट्रवादीचा एजंट आहे; हसन मुश्रीफ पुन्हा चंद्रकांत पाटलांवर बरसले

मी सहा वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या. पाच वेळा निवडून आलो. शरद पवारांच्या आशीर्वादामुळे 20 वर्षे मी मंत्री आहे. हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून जीवाला जीव देणारी माणसे तयार करावी लागतात. पाटलांना काय अनुभव आहे. पाटलांच्या लोकप्रियतेबद्दल मला काहीच बोलायचे नाही. ते प्रचंड लोकप्रिय आहेत. आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांना सवय आहे.

    कोल्हापूर : शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यावर अथवा महाविकास आघाडीवर बदनामीकारक टीका केल्यानंतरही गप्प बसू का अशा शब्दात टीका करीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एजंट आहे अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.

    पवार यांच्याबद्दल जिंदाल यांनी केलेल्या विधानावर भाजपाने माफी मागावी एवढीच मागणी केली होती, असे ते म्हणाले. तथापि चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी धुडकावून लावली होती.