मला कोरोनाची लक्षणे आढळली असून मी घरातच क्वारंटाईन आहे; उपचार सुरू आहेत – राजू शेट्टी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र सौम्य लक्षणे असल्याने ते घरातच क्वारंटाईन( home Quarantine) असून त्यांच्यावर उपचार (treatment) सुरू असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर (social media) कळवले आहे. मात्र कोरोना (corona) च्या विळख्यात येऊनही आपल्या शेतकरी (farmers) बांधवांच्या आरोग्याविषयी राजू शेट्टी अस्वस्थ आहेत.

त्यांनी शेतकरी बांधव आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे की, बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात, मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, त्यामुळे माझ्या संपर्कात येऊन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा, मी उपलब्ध असेन.

काल माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली,पण काल रात्रीपासून मला थोडा ताप येऊन अस्वथ वाटू लागले म्हणून मी डॉक्टर सतीश पाटील यांच्याकडे जाऊन HRCT टेस्ट केली व त्यातून समजले की माझे फुफ्फुस थोड्या प्रमाणात बाधित झाले आहे, ही कोरोना पॉझिटीव्हचीच लक्षणे आहेत, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी राहूनच उपचार घेत आहे ,कोरोना मान-सन्मान ठेवत नाही. तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षित राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुस-या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील, याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे. कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या !! अशी भावनिक साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे.