बिस्कीटाचा गोडवा उतरणार चहाच्या कपात, कोल्हापुरात चहा-कपाची भन्नाट जोडी मनभरून टाकणारी गोडी

लॉकडाऊनच्या (Lock Down) कालावधीत हैदराबादमधून (Hydrabad) या कप निर्मितीसाठीचे मशीन (Machine) बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची ( Biscuit Cup) निर्मिती जानेवारीपासून (January) सुरू केली आहे.

    कोल्हापूर : कोल्हापुरात ( Kolhapur ) आता चहा आणि कॉफी (Tea And Coffee)  घेतल्यानंतर त्याचा कपही खाता येणार आहे. येथील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे, राजेश खामकर यांनी पर्यावरणपूरक बिस्कीट (Biscuits) कपची निर्मिती करून प्लास्टिक, कागदी कपला (Paper Cup ) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एडिबल कटलरी निर्मितीची संकल्पना मॅकेनिकल इंजिनिअर दिग्विजय यांना सुचली. त्यावर याबाबतची माहिती त्यांनी ऑनलाईन शोधली. त्यातून हैदराबाद, गुजरातमध्ये उत्पादित होणारे खाण्यायोग्य चमचे, कप त्यांनी मागविले.

    लॉकडाऊनच्या कालावधीत हैदराबादमधून या कप निर्मितीसाठीचे मशीन बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची निर्मिती जानेवारीपासून सुरू केली आहे. सध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत. पुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स आदींची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

    परवडणाऱ्या दरात आणि मोठ्या प्रमाणात या बिस्कीट कपचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कप निर्मितीचे तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे मशीन बनविण्याची तयारी कोल्हापुरात सुरू केली आहे.