छत्रपती घराण्यात माझा जन्म म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही : संभाजीराजे छत्रपती

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपत यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच आंदोलन राज्यात सुरू झालं. कोल्हापूर,नाशिक या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आलं. आता संभाजी राजे छत्रपती यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. दरम्यान या कालावधीत बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्याची माहिती राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना दिली.

    कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपत यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच आंदोलन राज्यात सुरू झालं. कोल्हापूर,नाशिक या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आलं. आता संभाजी राजे छत्रपती यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती.

    दरम्यान या कालावधीत बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्याची माहिती राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना दिली. संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना तुम्ही शांतपणे आंदोलन का करताय असं विचारल्यावर माझा स्वभावच शांत आहे, ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा हे मला नक्की कळतं आणि छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, अशी समजच संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

    संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाबाबत राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्या सगळ्या चर्चेला खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी हे वक्तव्य करून पूर्णविराम दिला आहे. सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजी राजे छत्रपती यांची आज सारथी संस्थेबाबत चर्चा झाली. या दरम्यान राज्य सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली आहे. तसेचं आपल्या मागण्यांबाबत चालढकल केली जात आहे याबाबत ही संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे जर मुख्य केंद्र होत असेल तर आनंदच आहे. त्यामुळे राज्यातील इतर सारथी संस्थेच्या उपकेंद्रांना चालना मिळेल अस संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.