कृषी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच बोलत असल्याचा संशय – खासदार राजू शेट्टी

नी या कायद्याचे  समर्थन केले आहे, त्यांची समिती स्थापन केली आहे आणि ते आता न्यायालयाला काय वेगळे सांगणार आहेत,असा सवाल करत लवकरच आम्ही देशातील सर्वच शेतकरी नेते एकत्र बसून पुढील निर्णय जाहीर करु,असेही शेट्टींनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर: केंद्र सरकारने अमलात आणलेल्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच बोलत आहे, की काय असा संशय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. अशाप्रकारचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात येणार याची कालच कल्पना आली होती. असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ज्यांनी या कायद्याचे  समर्थन केले आहे, त्यांची समिती स्थापन केली आहे आणि ते आता न्यायालयाला काय वेगळे सांगणार आहेत,असा सवाल करत लवकरच आम्ही देशातील सर्वच शेतकरी नेते एकत्र बसून पुढील निर्णय जाहीर करु,असेही शेट्टींनी स्पष्ट केले आहे.