करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ; गुलाबी रंग सोनेरी काठाच्या शालूचे बाजार मूल्य १ लाख ७ हजार ७३० रुपये

शारदीय नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला तिरुपती संस्थान चा मानाचा शालू दरवर्षी अंबाबाईला येत असतो हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर नवमीला शालू देवीच्या अंगावर चढवला जातो त्यानंतर आ अलंकारिक पूजा बांधण्यात येते मात्र मागील दोन वर्षात कोरोनाजन्य परिस्थिती नवरात्र उत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता

    कोल्हापूर : तिरुपती तिरुमला देवस्थानकडून गुरूवारी करवीर निवासिनी अंबाबाईला गुलाबी रंग, सोनेरी काठ-पदराचा १ लाख ७ हजार ७३० रुपयांचा शालू अर्पण करण्यात आला. तिरुमला देवस्थान समितीचे डेप्युटी ऑफीसर एम.रमेश बाबु यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्विाकार करण्यात आला.

    शारदीय नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला तिरुपती संस्थान चा मानाचा शालू दरवर्षी अंबाबाईला येत असतो हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर नवमीला शालू देवीच्या अंगावर चढवला जातो त्यानंतर आ अलंकारिक पूजा बांधण्यात येते मात्र मागील दोन वर्षात कोरोनाजन्य परिस्थिती नवरात्र उत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता त्यामुळे तिरुपती होऊनही देवीला शालू आलेला नव्हता
    तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देशभरातील शक्तीपीठांना महावस्त्र किंवा शालू अर्पण केला जातो. त्यानुसार करवीर निवासिनी अंबाबाईलाही कित्येक वर्षापासून हा शालू अर्पण केला जात आहे. यावर्षी गुरूवारी सकाळी नवमीच्या तिथीला गोवींदाचा जयघोष करत शालू मंदिरात आणण्यात आला. यानंतर देवस्थान समिती कार्यालयात विधीवत मंत्रोपचारामध्ये शालू देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आला.

    यावेळी तिरुपती देवस्थान समितीच्या एम.कंचन,वेदपारायण पंडीत के.संपतकुमार,डी.जनार्दन,भरत ओसवाल,के.रामाराव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.