ambabai second day puja

दरवर्षी कोल्हापूरच्या पुरातन अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात विजयादशमीपर्यंत देवीची वेगवेगळ्या रुपात सालंकृत पूजा(kolhapur ambabai puja) बांधण्यात येते. श्रीपूजकांच्या वतीने धर्म शास्त्रावर आधारित विविध पौराणिक संदर्भाचा आधार घेऊन ही पूजा अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने बांधण्यात येते.

कोल्हापूर: आज नवरात्रोत्सवाचा(navratri) दुसरा दिवस अर्थात अश्विन शुध्द द्वितीया. दरवर्षी कोल्हापूरच्या पुरातन अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात विजयादशमीपर्यंत देवीची वेगवेगळ्या रुपात सालंकृत पूजा(kolhapur ambabai puja) बांधण्यात येते. श्रीपूजकांच्या वतीने धर्म शास्त्रावर आधारित विविध पौराणिक संदर्भाचा आधार घेऊन ही पूजा अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने बांधण्यात येते. साक्षात देवी अंबाबाई भक्तांना विविध रुपात दर्शन देऊन भक्ती रसात तल्लीन करत असल्याचा भास या विविध रूपातून होतो.

घटस्थापना झाल्यानंतर आजच्या या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी)ची  देवी पराशराना महाविष्णूस्वरूपामध्ये दर्शन देत आहे, अशी अलंकार पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा मकरंद मुनीश्वर माधव मुनीश्वर यांनी बांधली.

मंदिरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भक्तांचा शुकशुकाट जाणवत असल्याने देवस्थान समितीच्या वतीने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देवीच्या या विविध अलंकार पूजा भाविकांना सध्या देवीच्या लोभस दर्शनाने त्यांच्या निवासस्थानीच तल्लीन करून टाकत आहेत. भक्तसुद्धा देवीकडे कोरोनापासून लवकर मुक्ती दे अशी याचना करत आहेत.