कोल्हापूर, सांगलीला अलमट्टी धरणामुळे महापूर नाही तर..;अजित पवारांनी सांगितलं यामागील नेमकं कारण ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही जिल्ह्यांत पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती नेमकी कशामुळे झाली, या संदर्भात माहिती दिली आहे. 

    कोल्हापूर : राज्यात मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावासामुळे अनेक भाग जलयम झाले आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा कोकणासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला देखील बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीत महापूर आल्यामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अनेक लोकांना स्थलांतर करण्यात आलं. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही जिल्ह्यांत पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती नेमकी कशामुळे झाली, या संदर्भात माहिती दिली आहे.

    विशेषत: कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती येते असं म्हटलं जातं. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. एक गोष्ट बोलली जाते, कर्नाटकात अलमट्टी धरण बनल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुलाचा धोका वाढलेला आहे. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा केली. असं अजित पवार म्हणाले.

    पुढे पवार म्हणाले की, धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला. कर्नाटकने प्रतिसाद दिला. तसं काम आजही सुरु आहे. मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही. पण वरची जी काही धरणं आहेत, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. कोयना धरण महत्त्वाचं, या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो.

    अलमट्टीबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय साधला. अलमट्टीमुळे महापूर येतो असं अभ्यास समितीने म्हटलेलं नाही. सगळ्या नागरिकांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. जसे जसे पाणी ओसरत आहे तसे पंचनामे होतील. पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

    kolhapur and sangli are not flooded due to almatii dam says dcm ajit pawar in the press conference nrms