kolhapur corporation

कोल्हापूर महानगरपालिकेच्या(kolhapur corporation election) निवडणुकीचे पडघम अखेर आज वाजले.२१डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षणाच्या(reservation) सोडती काढण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या(kolhapur corporation election) निवडणुकीचे पडघम अखेर आज वाजले.२१डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षणाच्या(reservation) सोडती काढण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली असल्याने सध्या मनपावर आयुक्त कादंबरी बलकवडे यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.कोरोना महामारीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत.मात्र आता आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाल्याने इच्छुकांच्या जिवाची घालमेल वाढू लागली आहे.राजकीय पक्ष आणि नेते मंडळींनी सुद्धा प्रभागवार उमेदवार चाचपणी करून आरक्षण पडल्यास आयत्या वेळी कोणाला उमेदवारी देता येईल याचे आडाखे मांडायला सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर मनपा प्रशासनाला प्रारूप प्रभाग आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने प्रारूप प्रभाग आराखडा सादर केला आहे.त्यामुळे आता कोल्हापूर मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे कोरोनाच्या महामारीनंतर जोरात वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे.