कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी प्रसंगी दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू – पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही

अनाथ मुलांना त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी प्रसंगी दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आज कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली.

    कोल्हापूर: कोरोना(Corona) आजाराने ज्या मुलांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले असेल अशा मुलांना त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी प्रसंगी दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली.

    ते म्हणाले, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सूचना दिल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध माहितीनुसार एकूण ४५ मुलामुलींचे आई अथवा वडील यांच्यापैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.तर एका मुलाच्या आई आणि वडील दोघांचाही कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.

    अशा अनाथ झालेल्या मुलांचे शिक्षण आणि त्यांना लागणारी अन्य मदत कोल्हापूर जिल्हा म्हणून आम्ही निश्चितच करू.या मुलांना कोणत्या माध्यमातून मदत करता येईल याबाबत आगामी चार दिवसांत निर्णय घेतला जाईल.त्याचबरोबर अशा मुलांचे शिक्षण केवळ आई वडील नाहीत म्हणून थांबणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. प्रसंगी दत्तक घेऊन या मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.