kolhapur Kasba Sangaon GramPanchayat

कोल्हापुरात मंडलिक आणि मुश्रीफ गटाच्या आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीत(kolhapur Kasba Sangaon GramPanchayat) मंडलिक आणि मुश्रीफ गटाची आघाडी आहे. मात्र, आता या ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आघाडीत फूट पडली आहे. या राजीनामा नाट्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच परिस्थिती पाहता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे.

    कोल्हापूर : कोल्हापुरात मंडलिक आणि मुश्रीफ गटाच्या आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीत(kolhapur Kasba Sangaon GramPanchayat) मंडलिक आणि मुश्रीफ गटाची आघाडी आहे. मात्र, आता या ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आघाडीत फूट पडली आहे. या राजीनामा नाट्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच परिस्थिती पाहता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीमध्ये खासदार संजय मंडलिक आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने एकत्र येत आघाडी करून वर्चस्व निर्माण केले. चार वर्षांपासून या आघाडीची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. मात्र, आता ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

    कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कसबा सांगाव आहे. या ठिकाणी मंडलिक आणि मुश्रीफ गटाची एकत्रित सत्ता आहे. सरपंच रणजित कांबळे सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.