धक्कादायक! सॅनिटायझरच्या बाटलीने घेतला पेट, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणारे सॅनिटायझर हाताळताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

कोल्हापूर : कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला असून एका महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात २७ डिसेंबरला घडली. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणारे सॅनिटायझर हाताळताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सुनीता काशीद असं आहे. सुनीता घरातील कचरा पेटवत होत्या. त्यावेळी शिल्लक राहिलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. आगीत होरपळल्यामुळे सुनीता गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सॅनिटायझरच्या बाटल्या वापरताना हलगर्जी टाळण्याचं आवाहन यानिमित्ताने केलं जात आहे.