कोल्हापूर-मुबंई विमानसेवा या तारखेपासून होणार सुरु

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी 'डीजीसीए'कडून (DGCA) ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस (Three Days)  ही सेवा सुरू राहील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य त्या खबरदारी सह ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

कोल्हापूर – गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर – मुंबई विमानसेवा (Kolhapur-Mumbai Airline) २७ ऑक्टोबरपासून सुरू (October) होणार असल्याची माहिती विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया (Kamalkumar Kataria) यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते म्हणाले, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’कडून (DGCA) ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस (Three Days)  ही सेवा सुरू राहील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य त्या खबरदारी सह ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून २४ मार्चपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात करण्यात आली होती.

२५ मे पासून बंद झालेली देशांर्गत विमानसेवा काही प्रमाणात देशांतील प्रमुख मेट्रो सिटीबरोबरच काही छोटया शहरात सुरू करण्यात आली.त्यामध्ये अलायन्स एअर या विमान कंपनीकडून हैदराबाद – कोल्हापूर – बंगळुरू ये-जा अशी विमानसेवा सुरू झाली.तर इंडिगो कंपनीची हैदराबाद कोल्हापूर विमानसेवा सुरू झाली.गत १०० दिवसात कोल्हापूर विमानतळावरून ७६६ फेऱ्या झाल्या असून २४ हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.

विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ संचालक कमल कटारिया यांच्याबरोबरच खा. संजयमंडलिक, तसेच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप पुरी व भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे चेअरमन अरविंदसिंग यांना भेटून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली होती.

अशी असेल सेवा मुंबई-कोल्हापूर विमानसेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस सेवा सुरू राहील.

मुंबईवरून दुपारी १२.३० वा. विमान टेक ऑफ घेईल.

कोल्हापूर येथे १ वाजून २५ मिनिटांनी लँडिंग होईल.

१ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर येथून विमान टेकऑफ होईल.

मुंबई विमानतळावर २.४० वा. लँडिग होईल.