कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली ; फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील बहुतांश सर्व नद्यांची महापूरसदृश्य स्थिती आहे.  रस्त्यावर पाणी आल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तसेच सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाले आहे.

    वैभववाडी: राज्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे अनेक भागांत जलमय परिस्थिती निर्माण झाली आह. मुसळधार पावसामुळे तळेरे कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्गावर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे गगनबावडा ते कोल्हापूरदरम्यान ठिकाणचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राचा बऱ्याच अंशी संपर्क तुटला आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील बहुतांश सर्व नद्यांची महापूरसदृश्य स्थिती आहे.  रस्त्यावर पाणी आल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तसेच सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाले आहे.

    गगनबावाडा कोल्हापूर दरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे बुधवारी मध्यरात्री पासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. तर रस्ता खचल्यामुळे करुळ घाटमार्गांची वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली असून याही घाटाय दरडींची पडझड सुरु आहे.