कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; मुलावरही झाले घोटाळ्याचे आरोप

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क मधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या बळकावली असल्याचा गंभीर आरोप ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केला आहे. पालक मंत्री पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून अधिक अधिकार्‍यांवर दबाव आणून ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावे केली आहे.

    कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क मधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या बळकावली असल्याचा गंभीर आरोप ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केला आहे. पालक मंत्री पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून अधिक अधिकार्‍यांवर दबाव आणून ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावे केली आहे.

    त्यानंतर या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प उभा केला आहे. याच परिसरातील आणखी 33 गुंठे जमीन देखील आपल्याच नावावर करण्याच्या तयारीत साजिद मुश्रीफ असल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे. बळकावलेल्या जागांची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचं देखील कदम यांनी म्हटलंय.

    जिल्ह्यातील या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर राज्यपालांकडे देखील तक्रार करणार असल्याचं सुनील कदम यांनी स्पष्ट केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बेनामी संपत्तीचा आरोप होत असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ताराराणीने आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या या जमीन घोटाळा आरोपामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.