kolhapur zilla Parishad

शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या(Kolhapur ZP) जलव्यवस्थापन बैठकीला उपस्थित राहिलेल्या अध्यक्ष बजरंग पाटील(Bajrang Patil) यांना कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली . या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह(corona test positive) आला आहे

    कोल्हापूर: कोल्हापूर(Kolhapur) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील(Bajrang patil) यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह(Corona test positive) आला आहे.ते शुक्रवारी झालेल्या जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची मात्र आता चांगलीच धावपळ उडाली असून हे अधिकारी आता क्वारंटाईन झाले आहेत.

    शुक्रवारी जलव्यवस्थापन बैठकीला उपस्थित राहिलेल्या अध्यक्ष बजरंग पाटील यांना सर्दी, ताप आणि खोकला ही कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली . या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर आता कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.