चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरी हिसका; कार्यकर्त्यांनीच केली राजीनाम्याची मागणी

वादग्रस्त वक्तव्य करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  नेत्यांना टार्गेट करणारे चंद्रकात पाटील यांना त्यांच्याच पक्षातून टार्गेट करण्यात आले आहे. यामुळे आता माहाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच ही  राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे कोल्हापूरात भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी विधानपरिषद निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन या दोन्ही नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. वादग्रस्त वक्तव्य करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  नेत्यांना टार्गेट करणारे चंद्रकात पाटील यांना त्यांच्याच पक्षातून टार्गेट करण्यात आले आहे. यामुळे आता माहाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.