सप्टेंबर अखेरपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यास कोल्हापूरकरांना ४ टक्के सवलत

कोरोनाच्या(corona) परिस्थितीमुळे महापालिकेवर आर्थिक ताण येत असून या परिस्थितीत महापालिकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने नागरीकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरुन महापालिकेला आर्थिकदृष्टया सक्षम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर(kolhapur) शहरवासीयांनी त्यांचा देय असणारा घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अथवा ऑनलाईन पद्धतीने भरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. सप्टेंबर २०२० अखेर घरपट्टीची रक्कम भरल्यास महापालिकेने ४ टक्के सूट जाहीर केली आहे. या सवलतीचाही(concession) नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  कोल्हापूर महानगरपालिका(kohapur municiple corporation) महापौर निलोफर आजरेकर(nilopher ajrekar) व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी(dr.mallinath kalshetty) यांनी केले आहे.

कोरोनाच्या(corona) परिस्थितीमुळे महापालिकेवर आर्थिक ताण येत असून या परिस्थितीत महापालिकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने नागरीकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरुन महापालिकेला आर्थिकदृष्टया सक्षम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टी बरोबर इस्टेट, परवाना आणि अनुषंगिक करही नागरीकांनी तात्काळ भरावेत. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिका अधिकारी कर्मचारी अहोरात्र काम करुन कोरोना योध्द्यांची भूमिका बजावत आहेत. माहापालिकेची कोरोना काळातही आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी नागरीकांनी आपले सर्व प्रकारचे कर तात्काळ ऑनलाईन अथवा नागरी सुविधा केंद्रामध्ये भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.