martyr rushikesh jondhale indian army

शहिद ऋषिकेश जोंधळेंनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. त्यांची २ वर्षांपूर्वी बेळगामध्ये सैन्यात भरती झाली होती. जोधळे जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत असताना पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते.

कोल्हापूर : पाकिस्तानने १३ नोव्हेंबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला (martyr Rishikesh Jondhale ) आहे. आज भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र मोठा सण आहे. परंतु कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा प्रसंग ओढावला आहे. शहिद ऋषिकेश जोंधळेंना त्यांची बहिण अखेरचं ओवाळेल ( last seen by his sister) . शहिद जोंधळेंचे पार्थिव आज पहाटे त्यांच्या मूळ गावी दाखल झाले आहे.

शहिद जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या गावी असंख्य लोक जमा झाले आहेत. अनेक लोक बाहेरुन गावात दाखल झाले आहेत. फुलांचा वर्षाव करत नागरिकांना जोंधळेंच्या पार्थिवाला वंदन केले आहे. जोंधळेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

शहिद ऋषिकेश जोंधळेंनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. त्यांची २ वर्षांपूर्वी बेळगामध्ये सैन्यात भरती झाली होती. जोधळे जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत असताना पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना जोंधळे जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरमधून उपचारासाठी सैन्य दवाखान्यात नेले जात असताना त्यांचं निधन झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी कोल्हापूरातील बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. या बातमीनंतर संपूर्ण गावासह कोल्हापूरावर शोककळा पसरली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून जोंधळे यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. जोंधळे यांचे पार्थिव गावात आणल्यावर त्यांच्या घराजवळ काही काळ ठेवण्यात आले. पार्थिव गावाजवळ आल्यावर आईने आणि बहिणीने एकच हंबरडा फोडला आहे. त्यामुळे अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. वडिलांना भोवळ आल्याने इतर जवानांनी त्यांना आधार दिला.

जोंधळेंचे पार्थिव गावात आणल्यावर अमर रहे, अमर रहे… ऋषिकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत जोंधळेंची अंत्ययात्रा स्मशानात आली. यावेळी हजारो नागरिकांनी जोंधळेंना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या प्रत्येकी दोन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला. जोंधळे यांच्या पार्थिवाला अग्नि देताच त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा जोरजोरात हंबरडा फोडला.