त्र्यंबोली देवीच्या मंदिरात ललित पंचमी सोहळा उत्साहात

शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी येथील टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली देवीच्या मंदिरात ललित पंचमी (Lalit Panchami) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी यंदा कृतीयुक्त चतुर्थी आल्याने दरवर्षी पंचमीला होणारी त्र्यंबोली यात्रा यंदा चौथ्या दिवशी पार पडली.

  कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी येथील टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली देवीच्या मंदिरात ललित पंचमी (Lalit Panchami) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी यंदा कृतीयुक्त चतुर्थी आल्याने दरवर्षी पंचमीला होणारी त्र्यंबोली यात्रा यंदा चौथ्या दिवशी पार पडली.
  ललित पंचमी दिवशी त्रंबोली देवीला भेटीसाठी अंबाबाई मंदिरातून पालखी जाते, ही पालखी या ठिकाणी आल्यानंतर कोहळा पूजनाचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. यावेळी छत्रपती घराण्यातील मान्यवर उपस्थित असतात दुपारी बारा वाजता अंबाबाईची पालखी आल्यानंतर धार्मिक विधिवत कार्यक्रम पार पडल्यानंतर पारंपारिक पद्धतीने कोहळा पूजनाचा सोहळा पार पडला.
  पूजा, दर्शन झाल्यानंतर गुरु महाराज, शिवछत्रपती घराण्यातील मान्यवर यांनी पूजन केल्यानंतर अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कोहळ्याचा तुकडा घेण्यासाठी नागरिक आणि मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अंबाबाईची सुवर्ण पालखी शाही लवाजम्यासह सकाळी साडेनऊच्या त्र्यंबोली देवीच्या भेटीस निघाली.
  कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार मालोजीराजे छत्रपती व मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती सोहळा पार पडल्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी व कार्यक्रम पार पडला. हा सोहळा पार पडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्र्यंबोली देवीच्या यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक व्यवस्था आणि मार्गावरून वळविण्यात आली होती.
  करवीर निवासिनी श्री अंबाबाईची त्रंबोली ही मैत्रिणी 
  ललित पंचमी सोहळ्याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची त्रंबोली ही मैत्रिणी आहे. कोल्हासूर राक्षसाचा वध केल्यानंतर त्रंबोली देवीला ती पाहता न आलेने ती रुसून जाते. अंबाबाईला हे  समजताच स्वतः अंबाबाई तिचा रुसवा दूर करण्यासाठी त्रंबोली देवीच्या भेटीला जाते. हीच प्रथा आजही नवरात्री उत्सव सोहळात आजही पार पाडली जाते.