विधी व न्याय विभागाचा भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपचे वर्चस्व होते. महेश जाधव या समितीचे अध्यक्ष होते. जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ही समितीच बरखास्त करुन महाविकास आघाडीने भाजपला दणका दिल्याची चर्चा सुरु आहे.

    मुंबई : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे या समितीवर भाजपचे वर्चस्व होते. विद्यमान अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सहा सदस्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर होते. आता ही समितीच बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपचे वर्चस्व होते. महेश जाधव या समितीचे अध्यक्ष होते. जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ही समितीच बरखास्त करुन महाविकास आघाडीने भाजपला दणका दिल्याची चर्चा सुरु आहे.

    गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. अखेर विधी व न्याय विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. या समितीचा कार्यभार एक वर्षासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित करवीर निवासिनी अंबाबाई, श्री जोतिबा ही प्रमुख मंदिरे येतात. तसेच या समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३०४२ मंदिरांचा समावेश आहे.