कोल्हापूरात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम; फक्त अत्यावश्यक सेवा सुरु

    कोल्हापूर : जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत राहिल्याने पॉझिटिव्हीटी दर 13.8 टक्के इतका कायम राहिला आहे. जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश आहे. या वाढीव निर्बंधानुसार 12 जुलैपर्यंत कडक नियम लागू राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे यांनी सांगितले.
    कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील अन्य दुकाने आणि व्यवसाय बंदच राहणार आहेत. रुग्णसंख्या कमी होऊन पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित क्षेत्रातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा वेग आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे  जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवले आहेत.
    महापालिका क्षेत्र आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू केले  आहेत. 12 जुलैपर्यंत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरु राहणार आहेत. या नियमावलीचे कोणी उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.