महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद

शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक बस रोखली होती.

    कोल्हापूर : महाराष्ट्र -कर्नाटक यांच्यातील वाद पून्हा एकदा उफाळून आला आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र एसटी बस वर दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राज्याकडून सध्या एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक बस रोखली होती.

    दरम्यान,  शनिवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बस वर दगडफेक करम्यात आली. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.