मराठा आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार : समरजीतसिंग घाटगे

महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) आरक्षण रद्द केले. हे सरकार मराठा समाजाला गृहीत धरते. मराठा आरक्षण (maratha reservation) प्रश्नी या अंहकारी सराकला गुडघ्यावर आणू. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंग घाटगे (samarjitsinh ghatge) यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

    कोल्हापूर : मराठा समाजाला (maratha community) संघर्ष केल्याशिवाय काही मिळाले नाही. ५२ मूक मोर्चे काढल्यानंतर मागच्या सरकारने आरक्षण दिले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) आरक्षण रद्द केले. हे सरकार मराठा समाजाला गृहीत धरते. मराठा आरक्षण (maratha reservation) प्रश्नी या अंहकारी सराकला गुडघ्यावर आणू. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंग घाटगे (samarjitsinh ghatge) यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

    यावेळी घाटगे म्हणाले, ‘राज्यातील मागील सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयात वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने झापलेही आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने पुर्नयाचिका दाखल केली नाही. मागास आयोग नेमला नाही. मराठा समाजासाठी ज्या योजना जाहीर केल्या, त्या केवळ घोषणाच राहिल्या आहेत.