kolhapur corporation

कोरोना संकटात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना कोल्हापूर महापालिकेने दणका दिला आहे. ७ मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करत महापालिकेने दंज देखील वसुल केला आहे.

    कोल्हापूर : कोरोना संकटात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना कोल्हापूर महापालिकेने दणका दिला आहे. ७ मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करत महापालिकेने दंज देखील वसुल केला आहे.

    रविवारी दिवसभरात कोल्हापूर शहरातील २७ मंगल कार्यालयांवर पालिकेने कारवाई केली. सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे, ५० पेक्षा जास्त नागरिकांची मर्यादा ओलांडणे, सॅनिटायझर नसल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

    कारावाई झालेल्या या मंगल कार्यालयांकडून ३५ हजाराचा दंड देखील वसूल करण्यात आला. महापालिकेच्या या धाड सत्रामुळे मंगलकार्यालयांचे धाबे दणाणले आहेत.