निकालानंतर शेतकऱ्यांचं झालं ‘गोकूळ’, जिंकल्याच्या आनंदात बंटी पाटलांनी केली दरवाढ, दूध उत्पादकांना गिफ्ट

गोकूळ दूधसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ही घोषणा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २ रुपये अधिक देण्याची घोषणा करण्यात आली. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ झाला असून दूध उत्पादकांनीच आपल्याला चांगलं यश मिळवून दिल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. आम्ही आता निवडून आलो आहे, त्यामुळे अजेंडाही नवा असणार आहे, असं म्हणत त्यांनी २ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. 

    कोल्हापूरमधील गोकूळ दूधसंघाच्या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचंच नव्हे, तर राज्याचं लक्ष लागून होतं. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं घवघवीत यश मिळवलं. या विजयानंतर आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ देण्याची घोषणा करत आघाडीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुश केलंय.

    गोकूळ दूधसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ही घोषणा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २ रुपये अधिक देण्याची घोषणा करण्यात आली. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ झाला असून दूध उत्पादकांनीच आपल्याला चांगलं यश मिळवून दिल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. आम्ही आता निवडून आलो आहे, त्यामुळे अजेंडाही नवा असणार आहे, असं म्हणत त्यांनी २ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली.

    यापुढे मुंबईत गोकूळचा दबदबा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यात कुठंही कमी पडणार नसल्याचा दावा सतेज पाटील यांनी केलाय. २१ पैकी १७ जागा जिंकत बहुमत मिळवून सतेज पाटील यांच्या गटानं तब्बल ३० वर्षांनंतर गोकूळ दूधसंघात सत्तापरिवर्तन केलंय.